मनीषा केळकर 'इसीस 2' या इंटरनॅशनल इंग्रजी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटातील भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन युवा अभिनेता युवराज कुमार करणार असून मनीषा एका बंगाली तरुणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. बंगाली व्यक्तिरेखा असल्याने त्यासाठी बंगाली भाषेचे धडे मनिषाला सिनेमाचे संवाद लेखक हरीश भिमानी देत आहेत. या सिनेमाची पटकथा मनिषाचा भाऊ हेमंत केळकर याने लिहिली आहे.
विमान अपहरण, आतंकवाद या विषयावार आधारित हा सिनेमा मनिषाचा पहिला इंग्रजी सिनेमा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास मुंबई मध्ये नुकतीच सुरुवात झाली असून अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा पाठविण्यात येणार आहे. मुंबई मधील कांदिवली परिसरातील एका कॉलेजमध्ये या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे.
इसीस २ ची कथा विमान अपहरण आणि अतिरेकी कारवायांवर आधारित असून युएसएमधून भारतात यायला निघालेल्या विमानाचे अतिरेकी अपहरण करतात. त्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी काय काय केले जाते हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
Also Read : मनीषा केळकरचे मान्सून फोटोशुट