Tejaswini Pandit : सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'येरे येरे पैसा ३' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आज १८ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव हे तिघे एकत्र झळकले. पहिल्या दोन पार्टच्या यशानंतर आता 'येरे येरे पैसा ३' ही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतोय. याच चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण टीम वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये तेजस्विनी पंडितने चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा शेअर केला आहे.
'ये रे ये रे पैसा-३' चित्रपटाच्या निमित्ताने 'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखत दिली. त्यावेळी तिने एक किस्सा शेअर केला. तेव्हा ती म्हणाली, "माझं मागचं वर्ष हे प्रचंड स्ट्रेसफूल होतं म्हणजे मानसिक, शारिरीक आणि भावनिकदृष्ट्या ते खूप स्ट्रेसफूल होतं. कारण, मागच्या वर्षी मी खूप आजारी पडले. तेव्हा या चित्रपटाच्या दरम्यान मला स्लिप डिस्क आणि डेंग्यू पण झला होता. त्यावेळी मी तर सलाईन घेऊन चित्रपटाच्या सेटवर गेले आणि शूटिंग केलं. या चित्रपटाचं आणि टीमचं श्रेय हेच आहे की, शूटदरम्यान कुठेही माझ्या चेहऱ्यावरुन कळणार नाही की मी आजारी होते."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्या फक्त २ तास आराम करुन पुन्हा सेटवर आली आहे, अशा शेड्यूलमध्ये मी काम केलंय. मी सेटवर आले अलमोस्ट दीड तास शूट थांबलं कारण, अशी पण परिस्थिती झाली. पण, अशा वेळी देखील आपल्याला वाटणं की नाही सेटवर जाऊन काम करायचं आहे. टीमचा भाग व्हायचाय आणि आपल्याकडे आहे नाही ते सर्व या प्रोजेक्टसाठी द्यायचं आहे. असं वाटणं देखील हे त्या टीमचं श्रेय आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात देखील सेम झालं होतं. तेव्हा पण मी सलाईन घेऊन सेटवर गेले होते. त्यात आता तिसऱ्या भागातही असंच घडलं." असा खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीत केला.