Join us

"काही जखमा दिसत नाहीत.."; तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत, 'येरे येरे पैसा ३' रिलीजनिमित्त काय म्हणाली?

By देवेंद्र जाधव | Updated: July 18, 2025 11:12 IST

आज 'येरे येरे पैसा ३' सिनेमा रिलीज झाला आहे. त्यानिमित्त तेजस्विनी पंडितने मनातील भावना शेअर केली आहे.

'येरे येरे पैसा ३' सिनेमा आज रिलीज बोत होत आहे. या सिनेमात तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव हे तिघे एकत्र झळकले. पहिल्या दोन पार्टच्या यशानंतर आता 'येरे येरे पैसा ३'ची सर्वांना  उत्सुकता आहे. यानिमित्त तेजस्विनीने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तेजस्विनी लिहिते, "२०१७ ते आत्तापर्यंत…. मी , UK दादा आणि बंडोपंत ( सिद्धार्थ) आम्ही चौघेही एका क्षेत्रात काम करत होतो. एकमेकांना ओळखत होतो. पण जवळून नक्कीच नाही .YYP च्या निमित्ताने एकत्र आलो आणि कायमचे एकमेकांचे झालो."

"कारण काही जखमा दिसत नाहीत . जखमा होण्याच्यी कारणं वेगवेगळी असली तरी प्रत्येकजण आयुष्यात कुठेतरी किंवा कुणाकडून तरी दुखावले गेलो होतोच . आणि हाच आमच्यातला समानतेचा धागा होता. रोज मनातली घालमेल सुरू असताना आम्ही एक कॉमेडी चित्रपट करत होतो आणि म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर काही काळ का असेना , परकाया प्रवेशातून का असेना ,किंवा त्या नवीन मित्रांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेमुळे असो; हसू उमलत होतं. जुन्या गोष्टी, जुनी दुःखं मागे पडत होती. ह्यातच आमच्या मैत्रीची वीण घट्ट बसत गेली."

"मग सेटवर होणाऱ्या वैयक्तिक चर्चा , दादर च्या barista मध्ये,orchid हॉटेल च्या midnight buffet च्या वेळी, hajiali च्या सिताफळ क्रीम चा घास घेत , तर कधी bademiya च्या समोर उभ्या केलेल्या गाडीच्या बोनेट वर होऊ लागल्या. भेटी वाढत गेल्या. आधी काम, मग टाईमपास पासून सुरू झालेला हा प्रवास आज चूकलो तर एकमेकांचे कान धरण्यापर्यंत कधी आला कळलच नाही."

"किंबहुना 8 वर्षांनी आज मागे वळून पाहताना जाणवलं ते फक्त वय वाढलंय आणि शरीर थोडं (shape/size) बदललंय , बाकी गेल्या 8 वर्षात चित्रपटाचं नावंही बदललं नाही (YYP3) आणि आमचं भक्कम नातं ही.. हां आता जखमा तेवढ्या सुगंधी झाल्यात !!! तर प्रेक्षकहो, आज पासून येरे येरे पैसा ३ हा आमच्या मैत्रीचा सिनेमा तुमच्या स्वाधीन करत आहोत. आणि आमच्या केंद्रबिंदू ( संजय दादा) चा आज वाढदिवस आहे. त्याला आमच्या तिघांकडून प्रेम, शुभेच्छा आणि बरंच काही. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है ! तेवढं प्रेक्षक मित्र म्हणून तुम्ही पण पाठीवर शाबासकी द्यायला चित्रपटगृहात नक्की याल अशी आशा, अपेक्षा!"

टॅग्स :सिद्धार्थ जाधवये रे ये रे पैसा २उमेश कामततेजस्विनी पंडित