Join us  

आर्चीला झालंय तरी काय? इन्स्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट डिलीट, फक्त दोनच...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 2:17 PM

तिचे इन्स्टाग्रामवर ७ लाख फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरुची (Rinku Rajguru) वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. 'सैराट' सिनेमात आर्चीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचं मन जिकलं. 'बघतोस काय माझ्याकडे', 'थेट शेतात चालले' असं म्हणणारी ती साधी भोळी आर्चीच डोळ्यासमोर येते. रिंकूने पहिल्याच सिनेमात बुलेट आणि ट्रॅक्टर चालवत वुमन पॉवर दाखवून दिली. आर्चीच्या अदांवर सगळेच फिदा झाले. एका रात्रीत रिंकू प्रसिद्ध झाली. नुकतंच आर्चीच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांचं लक्ष गेलं आहे. रिंकूने इन्स्टाग्रामवर केवळ दोनच पोस्ट ठेवल्या असून बाकी सर्व डिलीट केल्या आहेत. पण रिंकूने असं का केलं हा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ७ लाख फॉलोअर्स आहेत. मराठी तसंच हिंदी मनोरंजनसृष्टीतीलही अनेक कलाकार तिला फॉलो करतात. तिच्या पोस्ट लाईक करतात, कमेंटही करतात. मात्र आता रिंकूने अचानक सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. आता तिच्या अकाऊंटवर फक्त दोनच पोस्ट दिसत आहेत. एक म्हणजे गेल्या वर्षी २६ जून रोजी पोस्ट केलेला एक व्हिडिओ आणि नुकतंच रक्षाबंधनानिमित्त भावासोबत पोस्ट केलेले फोटो. या दोनच पोस्ट तिने ठेवल्या आहेत.

रिंकूने इन्स्टाग्रामवर हे बदल करताच चाहते संभ्रमात पडलेत. पोस्ट डिलीट करण्यामागचं कारण ते काय या मूळ प्रश्नाचं उत्तर अजून समोर आलेलं नाही. हा सिनेमासाठी प्रमोशनल स्टंट तर नाही ना अशीही चर्चा आहे. रिंकू लवकरच ललित प्रभाकरसोबत 'खिल्लार' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी अभिनेताइन्स्टाग्राम