Join us

'तू का सगळ्यांना दादा म्हणतेस?' प्रार्थनाने भर मुलाखतीतच प्राजक्ताला विचारला थेट प्रश्न

By ऋचा वझे | Updated: February 27, 2025 13:35 IST

प्राजक्ता, प्रार्थना आणि प्रसाद मधलं हे संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होतंय.

'चिकी चिकी बुबूम बूम' हा आगामी मराठी सिनेमा उद्या महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय यामध्ये अभिनयही केला आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी आणि हास्यजत्रेतील बरेच कलाकार यामध्ये दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने टीम सगळीकडे मुलाखती देत आहे. यावेळी प्रार्थना बेहेरेने प्राजक्ता माळीला थेट विचारलेल्या प्रश्नाची चर्चा झाली आहे.

'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमाच्या टीमने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी प्राजक्ताचा उल्लेख 'प्राजक्ता ताई' असा केल्यावर तिने लगेच करेक्ट केलं. 'ताई म्हणू नका प्लीज' असं ती म्हणाली. यावर प्रार्थना बेहेरेने लगेच तिला विचारलं, 'तू सगळ्यांना का दादा म्हणतेस? मग तुला कोणी ताई का बोलू नये?' यावर प्राजक्ता म्हणाली, 'मी फक्त दाद देताना दादा म्हणते. इतर वेळी नावाने हाक मारते.' यानंतर प्रसाद खांडेकर तिला म्हणतो, 'मला का मग इतर वेळीही दादा म्हणतेस?' यावर ती हसत म्हणाली, 'तुझ्या शरीरयष्टीकडे बघून भीती वाटते.' 

प्राजक्ता, प्रार्थना आणि प्रसाद मधलं हे संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होतंय. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची  फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात  हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत. 

टॅग्स :प्राजक्ता माळीप्रार्थना बेहरेमराठी अभिनेतामराठी चित्रपट