Join us  

हेमांगी कवीने शिकवली ‘KISS’ची बाराखडी, हा व्हिडीओ एकदा बघाच..!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 12:06 PM

Hemangi Kavi : सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिच्या एका इन्स्टा रिलमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देहेमांगी कवी  म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील रोखठोक अभिनेत्री. स्वत:चे विचार परखडपणे मांडणारी बेधडक अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.

सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या तिच्या एका इन्स्टा रिलमुळे चर्चेत आहे. होय, या रिलमध्ये हेमांगी ‘किसची बाराखडी’ शिकवताना दिसतेय. आता ही किसची बाराखडी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हेमांगीने शेअर केलेला व्हिडीओ पाहावा लागेल. व्हिडीओत हेमांगी ‘फिसफिस चिक चिक मुहं मुहं आह,’ असंच काहीसं म्हणताना दिसते आहे. याच्या शेवटी ती किस देखील देताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू आहे आणि  अनेक सेलेब्सनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. हेमांगीने देखील ट्रेंड फॉलो केला आहे.

तिच्या या इन्स्टा रीलवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडत आहे. जांभळ्या रंगाची नऊवारी, पारंपारिक दागिने तसेच नाकात नथ अशा मराठमोळ्या लुकमध्ये हेमांगी दिसत आहे.

हेमांगी कवी  म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील रोखठोक अभिनेत्री. स्वत:चे विचार परखडपणे मांडणारी बेधडक अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. अनेकदा ती यावरून ट्रोलही होते. काही दिवसांपूर्वी हेमांगी ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे चर्चेत होती. यावरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं.   हेमांगी कवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने फक्त लढ म्हणा, डावपेच, कोण आहे रे तिकडे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ठष्ट, ती फुलराणी या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे.    

टॅग्स :हेमांगी कवी