Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद ओकच्या लेकाची कमाल! वडिलांना गिफ्ट केली थेट BMW कार, मंजिरी म्हणते- "तू २२व्या वर्षी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:06 IST

प्रसादला त्याच्या लेकाकडून एक मोठं सरप्राइज मिळालं आहे. २२ वर्षीय सार्थकने प्रसादला चक्क BMW कार भेट म्हणून दिली आहे.

प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने मोठ्या कष्टाने आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत जम बसवला. प्रसादचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रसादला त्याच्या लेकाकडून एक मोठं सरप्राइज मिळालं आहे. 

प्रसादचा लेक सार्थकचा आज वाढदिवस आहे. सार्थकने आपल्या वाढदिवशी वडिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. २२ वर्षीय सार्थकने प्रसादला चक्क BMW कार भेट म्हणून दिली आहे. प्रसादची पत्नी मंजिरीने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

मंजिरी ओकची पोस्ट

सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची...तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता (अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला (म्हणजे ३ सप्टेंबर २००२) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यांनी तुला ही सायकल सरप्राईज गिफ्ट म्हणून आणली होती. पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्यांनी तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही .(अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना 🤪)

त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद (लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे...

त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस. मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. (त्याऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल).

माझ्याकडे शब्द नाहियेत सार्थक...फक्त एवढंच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण…!!! खूप मोठा हो 🧿स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत 🙏🏽तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐♥️“B”est“M”any“W”ishes

मंजिरीने या पोस्टमधून लेकाचं कौतुक केलं आहे. तर या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करत कलाकारांनीही सार्थकचं कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतासेलिब्रिटी