Join us

पोटच्या मुलीप्रमाणे प्रसाद करतो 'तिच्या'वर प्रेम; video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:36 IST

Prasad oak: सध्या सोशल मीडियावर प्रसादचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंजिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा ते त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.

सध्या सोशल मीडियावर प्रसादचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंजिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये प्रसाद त्याच्या पाळीव श्वानासोबत दिसत असून पोटच्या लेकीप्रमाणे तो तिच्यावर प्रेम करताना दिसत आहे.

प्रसाद आणि मंजिरी यांना प्राण्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक पाळीव श्वानही आहे. मस्कारा असं या श्वानांच नाव असून ही जोडी तिच्यावर प्रचंड प्रेम करतात. इतकंच नाही तर तिच्या नावाचं एक सोशल मीडिया पेजदेखील आहे.

दरम्यान, मंजिरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद मस्करासोबत गप्पा मारत आहे. मस्कारा सोबतचा प्रसाद मला सगळ्यात जास्त आवडतो .., असं कॅप्शन देत मंजिरीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीसिनेमा