Join us  

'संघर्षयोद्धा'मध्ये मोहन जोशींची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 1:42 PM

Mohan joshi: संघर्षयोद्धा या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगत आहे. यामध्येच आता या सिनेमात मोहन जोशींची एन्ट्री झाल्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात कोणासाठीही नवीन नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळेच त्यांची ही संघर्ष कहानी लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता मोहन जोशी यांची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

अलिकडेच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार असून यात मोहन जोशी यांची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात ते मनोज जरांगे पाटील यांच्या ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, शिवाजी दोलताडे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती गोवर्धन दोलताडे करत आहेत. हा सिनेमा सोनाई फिल्म क्रिएशनअंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर त्याच्यासोबत अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिनेमामोहन जोशीसेलिब्रिटीमनोज जरांगे-पाटील