Join us  

"राज ठाकरे यारों का यार", अतुल परचुरेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्याने एकदा फोन करुन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:13 PM

राज ठाकरेंबद्दल अतुल परचुरेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "त्याच्यात बदलण्याची..."

अतुल परचुरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी अनेक मालिका व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. अतुल परचुरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या कार्यक्रमात अतुल परचुरेंनी हजेरी लावली होती. या मुलाखतीतील त्यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. या मुलाखतीत परचुरेंना "राज ठाकरेंना तू आधीपासून ओळखतो.राज ठाकरे कसा माणूस आहे? त्याच्यात बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, असं तुला वाटतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "राज ठाकरेने मला एकदा फोन करुन मी आहे हे तुला माहितीये ना, असं सांगितलं. तीन-चार वेळा तो मला घरी येऊन भेटून गेला. 'मी आहे ना' हे त्याचे बोलचं फार महत्त्वाचं होते."

"माझी पत्नी काहीही...", ३५ पुरणपोळ्यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

"त्याच्यात बदलण्याची इच्छा आहे. हे जे काय चालू आहे, ते बदलावं असं त्याला मनापासून वाटतं. मी त्याला शाळेपासून ओळखतो, त्यामुळे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. तो माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे. त्याने मला शाळेतील एक आठवण सांगितली होती. मी तेव्हा बालकलाकार म्हणून काम करायचो आणि तेव्हा मी स्टार होतो. मी शाळेत जायचो तेव्हा ते सगळे मला बघून 'हा अतुल परचुरे आहे,' असं म्हणायचे. त्यानंतर आम्ही कॉलेजला गेल्यावर कायम भेट होत राहायची," असंही ते पुढे म्हणाले. 

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर 'आई कुठे...' फेम अरुंधती भारावली, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

"राज ठाकरे यारों का यार आहे. एवढ्या सढळ हस्ते आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळणार माणूस मी पाहिलेला नाही. मी खूप काळ त्याच्याबरोबर घालवलेला आहे. आताच्या राजकारणात त्याच्यासारखा नेता हवा, पण त्याला ताकदही दिली पाहिजे. तो एकटा आहे. तुमचे उमेदवार निवडून आल्यावर, तुमच्यामागे आमदार, खासदार असल्यावरच तुमची ताकद वाढत जाते. त्याच्याकडे ताकद आहे...तो म्हणतो, मी एकटाच पुरेसा आहे. पण, समोरच्याबरोबर लढायचं असताना, ताकद हवी," असंही अतुल परचुरेंनी सांगितलं. अतुल परचुरेंचा हा व्हिडिओ मनसेच्या सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेअतुल परचुरेमराठी अभिनेतामराठी चित्रपट