Join us  

'जय जय स्वामी समर्थ'फेम 'या' अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 10:15 AM

Marathi actor: यापूर्वी त्याने 'बापमाणूस' या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

ठळक मुद्दे“अमाप खुश झालो… नेत्रा आई आणि मी बाप झालो…” असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आनंद प्रभू याच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आनंदच्या पत्नीने नेत्राने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी आनंदने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  'अमाप खुश झालो', असं म्हणत त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

आनंदने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या बाळासोबत एक फोटो शेअर केला आहे. सोबतच फोटोवर मजकूर लिहीत आपण बाबा झाल्याचं सांगितलं आहे.  “अमाप खुश झालो… नेत्रा आई आणि मी बाप झालो…” असं कॅप्शन आनंदने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, आनंद प्रभू हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत तो दाजीबा सरकार ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने 'बापमाणूस' या मालिकेत काम केलं आहे. तर आनंद प्रभूची पत्नी नेत्रा केतकरदेखील कलाविश्वाशी जोडलेली आहे. नेत्रा ही एक उत्तम नृत्यांगना आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी