'मंदिर तू' अल्बमला अमृता फणवीस यांनी चढवली आपल्या आवाजाने साज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:07 IST
तरुण निर्माते अजय सूर्यवंशी यांनी 'मंदिर तू' या भक्तिमय अल्बमची निर्मिती केली आहे. या भक्ती गीतांच्या अल्बम मध्ये श्रीमती ...
'मंदिर तू' अल्बमला अमृता फणवीस यांनी चढवली आपल्या आवाजाने साज
तरुण निर्माते अजय सूर्यवंशी यांनी 'मंदिर तू' या भक्तिमय अल्बमची निर्मिती केली आहे. या भक्ती गीतांच्या अल्बम मध्ये श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस यांनी सुमधुर आवाजात एक भक्तिमय प्रार्थना गायली आहे. नुकतेच या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. बालसुधार गृहात स्वतःचे बालपण घालवणारे या अल्बमचे निर्माते अजय सूर्यवंशी यांनी अमृता फडणवीस यांचे आभार मानले माझ्यासारख्या अनाथ मुलांसाठी अमृताजी *मंदिर तू* ही प्रार्थना गायला तयार झाल्या, ही मोठीच गोष्ट आहे. या अल्बममधील गाणी गीतकार राजू सपकाळ यांनी लिहिले असून, त्याला आशिष मोरे यांनी संगीत दिले आहे. *मंदिर तू* चे दिग्दर्शन दिनेश मेंगडे यांनी केले तर छायाचित्रण मिलिंद कोठावदे यांनी केले असून कार्यकारी निर्माता म्हणून इंदुराव कोडले पाटील यांनी कार्य पाहिले आहे. निर्मिती व्यवस्थापक म्हणून समीर नारकर यांनी जबाबदारी पार पाडली. 'मंदिर तू' ही प्रार्थना लवकरच प्रकाशित होत असून, अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत *प्रकाशन सोहळा* होणार असल्याचे निर्माते अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. अजय सूर्यवंशी व दिलीप कटके यांचा रिमांड होम हा हिंदी सिनेमा ही लवकरच प्रदर्शित होत आहे. बालसुधार गृहातील मुलांना भारतीय म्हणून ओळख मिळावी म्हणून मी व माझ्यासारखे शेकडो मुले सरकार दरबारी फेऱ्या मारतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाकडे गंभीर्याने पाहिले. अमित शाह यांनीही बालसुधार गृहातील मुलांसाठी सकारात्मक पाऊले उचण्याचे आश्वासन दिले होते..अजय सूर्यवंशी यांचे लहान पण फार मोठ्या संघर्षात गेले आहे. आदित्य बिर्ला सेंटर मध्ये त्यांची प्रवेश झाल्याने त्यांच्या जगण्याला, जडण घडणीला नवा व समाजाभिमुख आकार मिळाल्याचे ते सांगतात.