Join us

मकरंद संदीपची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 14:08 IST

अभिनेता मकरंद अनासपूरे आणि संदीप पाठक यांची भन्नाट केमिस्ट्री 'रंगा पतंगा' या चित्रपटात पहाता येणार आहे. या दोघांनी जुम्मन ...

अभिनेता मकरंद अनासपूरे आणि संदीप पाठक यांची भन्नाट केमिस्ट्री 'रंगा पतंगा' या चित्रपटात पहाता येणार आहे. या दोघांनी जुम्मन आणि पोपट या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मकरंद आणि संदीप दोघंही मराठवाड्याचे आणि चित्रपटात वऱ्हाडी बोली होती. मकरंदला वऱ्हाडी बोलण्याची माहिती होती. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी विदर्भाचे असल्यानं त्यांनी मकरंदला संवादांसाठी मदत केली. तर, मकरंदनं संदीपला वऱ्हाडी बोलण्यासाठी मदत केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मकरंद इतका रमला होता, की आपला सीन नसूनही तो सेटवर असायचा. त्यामुळे मकरंद आणि संदीपची केमिस्ट्री छान जमली. 'रंगा पतंगा छपडनेको मंगता' म्हणत त्यांना शोधण्यासाठी या दोघांनी केलेल्या करामतींमधून त्याचा परिणाम चित्रपटात दिसून आला आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित 'रंगा पतंगा' १ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.