Join us
Daily Top 2Weekly Top 5

मांजरेकरांनी वीर दौडले सात जाहिर करताचा लेक लागली जोरदार तयारीला, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:49 IST

अभिनेते - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत एका नव्या सिनेमाची घोषणा केली

अभिनेते - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत एका नव्या सिनेमाची घोषणा केली . आणि या सिनेमांचं नाव म्हणजे ‘वीर दौडले सात’. महेश मांजरेकरांनी हा सिनेमा जाहिर करताच त्यांची लेक मात्र तयारीला लागलीये. आता तुम्ही विचार कराल सई मराठी सिनेमा करतेय का... तर तसं नाहिये. सई नाहि तर महेश  मांजरेकरांची धाकटी लेक अभिनेत्री गौरी इंगवले ही ‘वीर दौडले सात’ सिनेमाच्या तयारीला लागली असल्याचं तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे अंदाज लावला जातोय..

सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेल्या गौरीने नुकताच तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत सुंदररित्या घोडेस्वारी करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवरुन तिने घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतल्याचंही म्हटलं जात आहे. तिच्या या व्हिडीओवरून ती वीर दौडले सात या सिनेमासाठी तयारी करत असल्याचं समजयलं जातयं.

 आता ती या सिनेमात झळकणारे की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गौरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. इतंकच नाही तर तिच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील होत आहे. या व्हिडीओमध्ये गौरी वाऱ्याच्या वेगाने घोडेस्वारी करत आहे. त्यामुळे तिच्यातील हे नवं कौशल्य ही चाहत्यांच्या समोर आलं आहे. 

टॅग्स :महेश मांजरेकर