भारतासह परदेशात एकाच वेळी रिलीज होणार महेश मांजेरकरचा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 21:33 IST
महेश मांजरेकर, अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत असतानाच त्याचवेळी परदेशातही एकाच वेळी ...
भारतासह परदेशात एकाच वेळी रिलीज होणार महेश मांजेरकरचा चित्रपट
महेश मांजरेकर, अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत असतानाच त्याचवेळी परदेशातही एकाच वेळी रिलीज होणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. यामुळे परदेशात असलेल्या भारतीय चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल. परदेशातील भारतीयांना इंडियन मुव्ही फ्रेण्डच्या माध्यमातून ही संधी मिळणार आहे. अमेरिका, कॅनेडा, ब्रिटेन, संयुक्त अरब अमिरात, आॅस्ट्रेलिया व न्यूझिलंड या देशांत भारतीयांची संख्या मोठी असल्याने येथे भारतीय चित्रपट आवडीने पाहिले जातात. मात्र कमी व मध्यम बजेटचे चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची साधने आतापर्यंत उपलब्ध नव्हती. इंडियन मुव्ही फ्रेण्ड या ब्रिटेनच्या स्टार्टअपने ही संधी मिळवून दिली आहे. इंडियन मुव्ही फ्रेण्डच्या माध्यमातून अनिवासी भारतीयांना भारतात रिलीजच्या वेळी सुरक्षित डिजीटल प्लेटफार्मच्या माध्यमातून भारतात चित्रपट रिलीज होताना तो पाहता येणार आहे. विशेष म्हणेज यामाध्यमातून पायरेसीची होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. चंद्रकांत कुळकर्णी दिग्दर्शित आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती देताना महेश मांजरेकर म्हणाला, जे निर्माते अर्थपूर्ण चित्रपट जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यास उत्सुक आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. अनेक निर्माते आपले गुणवत्तापूर्ण चित्रपट परदेशात प्रदर्शित करू शकत नाहीत. त्याना याचा फायदा होणार आहे. इंडियन मुव्ही फे्र ण्डच्या माध्यमातून निर्मात्यांना परदेशातील भारतीयांपर्यंत पोहचता येणार आहे. आमचा आगामी चित्रपट ज्यावेळी भारतात रिलीज केला जाईल त्याच वेळी तो परदेशात असलेल्या भारतीयांना पाहता येणार आहे. जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी इंडियन मुव्ही फ्रेण्डची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून सुमारे ३ दशलक्ष अनिवासी भारतीयांना देशातील विविध भाषांत तयार होणाºया चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.