Join us
Daily Top 2Weekly Top 5

धकधक गर्ल माधुरी दीक्षित करणार मराठी सिनेमात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:03 IST

काही वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये  महेश मांजरेकर यांनी 'श्यामची आई' हा सिनेमा करणार असल्याचा निर्धार केला आहे अशी बातमी आली ...

काही वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये  महेश मांजरेकर यांनी 'श्यामची आई' हा सिनेमा करणार असल्याचा निर्धार केला आहे अशी बातमी आली होती.त्यात आईची भूमिका साकारत धकधक गर्ल माधुरी मराठीत पदार्पण करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या.मात्र त्या फक्त चर्चाच राहिल्या. आता पुन्हा एकदा माधुरी दीक्षित मराठीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत.माधुरी मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे समजतंय.नव्वदच्या दशकात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी धकधक गर्ल आता मराठी रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, मात्र माधुरी कोणत्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार नसून मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे बोलले जात आहे.धकधक गर्ल माधुरी तिच्या सिनेमा आणि छोट्या पडद्यावरच्या प्रोजेक्टमध्ये चांगलीच बिझी होती.आपली डान्स अकॅडमी  लॉन्च केल्यानंतर तिच्या प्रसिद्धीमध्ये ती काही काळ बिझी होती.त्यानंतर तिने 'डेढ इश्कियाँ' आणि 'गुलाब गँग' सिनेमाच्या माध्यमातून दमदार कमबॅक केले.मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यापासूनही माधूरी दीक्षित लांब राहू शकली नाही.'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोच्या माध्यमातून डान्सच्या टीप्स देताना माधुरी झळकली होती. आता मराठी सिनेनिर्मितीत उतरल्यानंतर ती माधुरी दीक्षित काय कमाल करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.