Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधवी निमकर अन् सोनाली खरे आहेत बहिणी; 'चला हवा येऊ द्या' फेम 'हा' कलाकारही आहे त्यांचा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 17:39 IST

Marathi actress: सोनाली आणि माधवी यांचं नातं फारसं कोणालाच माहित नाही. परंतु, या दोघी खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या बहिणी आहेत.

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं एकमेकांशी काही ना काही नात आहे. यात बऱ्याचदा मराठी कलाविश्वात बहीण-भावाच्या, बहिणी-बहिणींच्या जोड्या पाहायला मिळतात. यात खासकरुन मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे, अभिषेक देशमुख-अमृता देशमुख, अभिनय बेर्डे- स्वानंदी बेर्डे या लोकप्रिय बहीण-भावांची कायमच चर्चा होत असते. परंतु, सध्या सोशल मीडियावर अशा भावंडांची चर्चा रंगलीये जे एकाच कुटुंबात असून तिघेही कलाविश्वात सक्रीय आहेत.

माधवी निमकर आणि सोनाली खरे या दोन लोकप्रिय अभिनेत्रींना आजच्या घडीला कोणी ओळखत नाही असं म्हणणारे क्वचितच एखादा व्यक्ती दिसून येईल. यात माधवीने छोटा पडदा गाजवला आहे. तर, सोनालीने रुपेरी पडद्यासह छोटा पडदाही गाजवला आहे. त्यामुळे या दोघींनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, या दोघी एकमेकींच्या बहिणी असल्याचं फार मोजक्या लोकांना माहित आहेत. इतकंच नाही तर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील एक कलाकारही यांचा सख्खा मावस भाऊ आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील लोकप्रिय संगीत संयोजक तुषार देवल हा सोनाली आणि माधवी यांचा भाऊ आहे. अलिकडेच तुषार आणि त्याची पत्नी अभिनेत्री स्वाती देवल यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलत असताना त्याने माधवी आणि सोनाली या माझ्या बहिणी असल्याचं सांगितलं.

सोनाली, माधवी आणि तुषार एकमेकांचे सख्खे मावस भावंड आहेत. इतकंच नाही तर तुषारची पत्नी स्वाती ही सोनालीची बालपणीची मैत्रीण आहे. या दोघी एकाच शाळेत, एका वर्गात होत्या. त्यामुळे दोघींचंही एकमेकींच्या घरी येणं-जाणं होतं. पण, तिला तुषार आणि सोनाली एकमेकांचे भावंडं आहेत हे तिला माहित नव्हतं.

दरम्यान, तुषारशी लग्न करत असताना स्वातीला तुषार, सोनाली आणि माधवी यांचं नावंत कळलं. माधवी आणि सोनालीप्रमाणेच स्वातीही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती राणी मी होणार या मालिकेत काम करत आहे. तर, यापूर्वी तिने पुढचं पाऊल, कळत नकळत, वादळवाट, फु बाई फु, पारिजात अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :सोनाली खरेसिनेमाटेलिव्हिजनसेलिब्रिटी