Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लकी' फेम दीप्ती सतीचा ट्रेडिशनल लूक पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:40 IST

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूप चर्चेतही आली होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. परंतु यावेळेस ती ट्रेडिशनल लूकमुळे चर्चेत आली आहे.

दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून सोशल मीडियावर तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. मात्र नुकताच तिने साडीतील फोटो शेअर केला आहे आणि सांगितले की, 'जाहिराती ट्रेडिशनल लूक'.

दीप्ती सतीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून त्यावर कॉन्ट्रास्ट हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या साडीत दीप्ती खूप गोड दिसते आहे. नेहमी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसणारी सती साडीतही तितकीच ग्लॅमरस वाटते आहे. तिच्या या फोटोला खूप चांगली दाद मिळते आहे.

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सतीसोबत अभय महाजन मुख्य भूमिकेत होता. 

टॅग्स :लकी