Join us

लव्ह प्लस अ‍ॅक्शन असा दबल धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 14:35 IST

सध्या मराठीमध्ये अनेक चित्रपट लव्हस्टोरी हा विषय घेऊन येत आहे. पण या चित्रपटाचे नाव फक्त तुझ्यासाठीच असले तरी या ...

सध्या मराठीमध्ये अनेक चित्रपट लव्हस्टोरी हा विषय घेऊन येत आहे. पण या चित्रपटाचे नाव फक्त तुझ्यासाठीच असले तरी या चित्रपटात लव्हस्टोरीसोबत अ‍ॅक्शनसीन देखील पाहायाला मिळणार आहे. लव्ह प्लस अ‍ॅक्शन असा दबल धमाका असणारा फक्त तुझ्यासाठीच हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेता यश कपूर याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. या चित्रपटात यश सोबत सिया पाटील ही मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहे. तर लीना बोकेफोडे, अंकिता तारे, नफे खान, विलाश उजवणे, अंजली उजवणे आदि कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एस प्यारेलाल आणि जगन्नाथ रंगधोल यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्माते कणक पटेल, राजेंन्द्र रावत, मिलिंद पांडे,ओमप्रकाश सिंग असून सह निर्माते अनुभव  एस विनोद आहेत. त्याचप्रमाणे स्वपन रे यांनी क्रिएटिव्ह निर्मातेची जबाबदारी सांभाळली आहे.