Join us
Daily Top 2Weekly Top 5

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेंनी पत्नी प्रिया यांना दिलं होतं हे पहिलं गिफ्ट, अभिनेत्याचा दुर्मिळ व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 07:00 IST

Laxmikant Berde: सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा एक दुर्मिळ व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी कलासृष्टी समृद्ध करणारा दिवंगत अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचे निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, त्याच्या आठवणी त्याच्या उत्तम अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. म्हणूनच, आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणताही चित्रपट लागला की प्रेक्षक आवर्जुन पाहतात. दरम्यान इतक्या वर्षानंतर आता सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक दुर्मिळ मुलाखत व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा एक दुर्मिळ व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ 'जोडी नं १' या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना एकमेकांबाबत प्रश्न विचारताना दिसून येत आहे. तिच्या प्रश्नांना लक्ष्मीकांत बेर्डेसुद्धा मजेशीर अंदाजात उत्तरे देताना दिसून येत आहेत.

यावेळी रेशम टिपणीसने लक्ष्मीकांत यांना विचारले होते की, 'तुम्ही प्रिया यांना दिलेले पहिले गिफ्ट कोणते? यावर उत्तर देत लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले की, मी खूप गिफ्ट दिले आहेत. यावर रेशम म्हणते, असे नाही पहिले कोणते होते ते सांगा.... त्यावर लक्ष्मीकांत म्हणतात की, 'मी प्रियाला पहिले गिफ्ट म्हणून साडी दिली होती'. लक्ष्मीकांत यांची ही दुर्मिळ मुलाखत सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांना अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलं असेल. प्रिया बेर्डे केवळ अभिनेत्रीच नव्हे तर त्या हॉटेल व्यावसायिकदेखील आहेत. विशेष म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलांनी कलाविश्वात पदार्पण केले आहे. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे