Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची मुलगी दिसायला फारच सुंदर,अभिनय सोडून करते 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:00 IST

रिमा लागू यांच्याप्रमाणे त्यांची मुलगीदेखील उत्तम अभिनेत्री आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तिनेही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मराठी कलाकार हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडतात. दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्या नावाचा उल्लेख होणार नाही हे तर अशक्यच. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रिमा लागू प्रसिद्ध होत्या.हिंदी सिनेमात त्यांनी आपली वेगळीच छाप पाडली होती. कित्येक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली. रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिका त्यांनी तितक्याच सहजतेने साकारल्या होत्या. 

रीमा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या.लहानपणापासूनच रिमा यांनी अभिनय करायला सुरुवात केली होती. शेवटपर्यंत त्या रसिकांचे मनोरंजन करत राहिल्या. १८ मे २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रिमा लागू त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून सदैव रसिकांच्या मनात राहतील.  

रिमा यांच्याप्रमाणे त्यांची मुलगीदेखील उत्तम अभिनेत्री आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तिनेही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रिमा यांच्या मुलीचे नाव आहे मृण्मयी. २०१० साली आलेल्या ‘हॅलो जिंदगी’ या हिंदी सिनेमात मृण्मयीने काम केले होते. त्याचप्रमाणे ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ सिनेमात तिने पुष्कर ओकच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

‘बायको’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’  मराठी सिनेमातही ती झळकली आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिने सेकंड युनिट डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘तलाश’, ‘थ्री इडियट्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारख्या गाजलेल्या सिनेमांसाठीही काम केले आहे.

 

याशिवाय ‘दंगल’, ‘जेट ट्रॅश’, ‘पीके’, ‘गुलाब गॅंग’ ह्यासारख्या सिनेमांसाठी स्क्रिप्ट सुपरवाईसर म्हणून काम केले आहे.मृण्यमीने अभिनेत्रीसोबतच लेखिक आणि दिग्दर्शिका म्हणूनही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. 

मृण्मयीने १ डिसेंबर २०१४ मध्ये असिस्टंट डायरेक्टर विनय वायकुळ सोबत लग्न लग्न करत संसार थाटला.ती मुंबईतच राहते. मृण्मयी रिमा यांच्याप्रमाणेच दिसायला फार सुंदर आहे. मृण्मयीमध्ये रिमा यांची झलक पाहायला मिळते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

टॅग्स :रिमा लागू