Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या लाडक्या अभिनेत्री त्यांच्या नावापुढे लावतात का आडनाव ?जाणून घेण्यासाठी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 17:14 IST

कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकतात. रसिकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवतात. रसिकांच्या मनात या कलाकारांची नावं घर करुन असतात. ...

कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकतात. रसिकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवतात. रसिकांच्या मनात या कलाकारांची नावं घर करुन असतात. रसिकांच्या मनात या कलाकारांच्या अभिनयासह त्यांची नावं घर करुन असतात.या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी येतात. त्यांच्या नावानेच त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते.अनेक कलाकारांची नावं रसिकांच्या मनात घर करुन आहेत.असेच काही प्रसिद्ध कलाकार आहेत जे आपल्या नावासह त्यांचे आडनाव लावत नाही.आपले पूर्ण नाव न लावता ते केवळ आपलं स्वतःचं नाव आणि त्यापुढे आपल्या वडिलांचे नाव लावतात.त्यामागे कोणते कारण आहे अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही. मात्र त्या कलाकारांच्या भूमिकेच्या नावाप्रमाणेच त्यांचे खरं नाव रसिकांच्या लक्षात असते. अशाच कलाकारांपैकी दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल. छोट्यापडद्यावरील काहे दिया परदेस ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती.बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. बनारसच्या शिवच्या प्रेमात पडलेली सरळ साधी मराठमोळी गौरी सावंत रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. गौरीचा मालिकेतला अंदाज रसिकांना चांगलाच भावला होता.गौरी ही भूमिका अभिनेत्री सायली संजीव हिने साकारली होती.सायलीचे आडनाव संजीव नसून ते तिच्या वडिलांचे नाव आहे.तिचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसारकर असे आहे.मात्र 'काहे दिया परदेस' या मालिकेपासून ती सायली संजीव या नावानेच आता रसिकांमध्ये लोकप्रिय आहे.सायलीप्रमाणे छोट्या पडद्यावरील शनायाचे नावही तसंच आहे.छोट्या पडद्यावर 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत गुरु-राधिका-शनायाची जुगलबंदी रसिकांना चांगलीच भावते.या मालिकेतील शनाया तर रसिकांचे धम्माल मनोरंजन करते.या मालिकेत शनाया ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील ही साकारते.मात्र रसिकाचे खरे नाव फार कमी जणांना माहित आहे.रसिकाचे पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असे आहे.मात्र असं असलं तरी रसिका फक्त रसिका सुनील आडनाव न लावता शॉर्टकटच वापरते. यामागे नेमके काय कारण हे फक्त सायली आणि रसिकांनाच माहिती.Also Read:तुमची लाडकी गौरी सध्या काय करते,लवकरच सायली संजीव झळकणार रुपेरी पडद्यावर!