भूमीने भरविले भुषणला लाडु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 18:52 IST
भुषण प्रधान आणि भूमी पेडणेकर ही झक्कास जोडी आपल्याला लवकरच आका जाहिरातीत पहायला ...
भूमीने भरविले भुषणला लाडु
भुषण प्रधान आणि भूमी पेडणेकर ही झक्कास जोडी आपल्याला लवकरच आका जाहिरातीत पहायला मिळणार हे तर सर्वांनाच माहित आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने भुषण आणि भूमी ही जोडी प्रथमच एकत्र येत आहे. सध्या सणांचा मोसम सुरु असून टिव्हीवर वेगवेगळ््या जाहिराती झळकत आहेत. भुषण आणि भूमीची ही जाहिरात देखील सणांच्या दरम्यानच येणार आहे. या जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी भुषणला लाडु खायचे होते. परंतू त्याला गोड खायला अजिबातच आवडत नाही. आणि या जाहिरातीसाठी एक संपुर्ण लाडु भूमी त्याला भरविणार होती. या सीन साठी भुषणला तब्बल दहा ते बारा रिटेक द्यावे लागले आणि नाईलाजास्तव १० ते १२ लाडु फस्त करावे लागले. त्यामुळेच भुषणवर कामासाठी काहीपण असेच म्हणण्याची वेळ आली आहे.