ललित बनला नेपथ्यकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 13:24 IST
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे ललित प्रभाकर हे नाव घराघरात पोहोचले. मुली तर ललिलच्या अक्षरशः प्रेमातच पडल्या होत्या. ही ...
ललित बनला नेपथ्यकार
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे ललित प्रभाकर हे नाव घराघरात पोहोचले. मुली तर ललिलच्या अक्षरशः प्रेमातच पडल्या होत्या. ही मालिका संपल्यानंतर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील काही भागातही तो झळकला होता. अभिनयात आपले नाव कमावल्यावर ललित आता दिग्दर्शनाकडे वळला आहे. बैल मेलाय या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. या नाटकात आरती वडगबळकर, रोहन गुजर यांसारखे छोट्या पडद्यावरचे कलाकार आहेत. या नाटकाविषयी ललित सांगतो, मी अभिनेता असलो तरी दिग्दर्शन ही गोष्ट माझ्याासाठी काही नवीन नाही. मी याआधी अनेक एकांकिकांचे तसेच नाटकांचेही मी दिग्दर्शन केले आहे. युगंधर देशपांडेने लिहिलेली ही कथा मला खूप आवडल्याने मी या नाटकाचे दिग्दर्शन करण्याचा विचार केला. या नाटकाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या नाटकाचे नेपथ्यदेखील मीच केलेले आहे. या नाटकातील सगळेच कलाकार हे त्यांच्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने आम्ही रात्री 11 ते 2च्या वेळात या नाटकाच्या तालमी केल्या. मी अभिनयापेक्षा दिग्दर्शन अधिक एन्जॉय करतो असे मला वाटते.