'लाल इश्क'चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 09:59 IST
बॉलीवुडचा तगडा दिग्दर्शक संजय लिला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चं पहिलं मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
'लाल इश्क'चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज
बॉलीवुडचा तगडा दिग्दर्शक संजय लिला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चं पहिलं मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.'इश्क म्हणजे निरपेक्ष बंध...इश्क म्हणजे दोन देह एक श्वास...पण इश्काला जेव्हा रोमांचाचा रंग चढतो...तेव्हा इश्काचा रंग होतो लाल'...अशी टॅगलाइन असलेलं मोशनपोस्टर रिलीज झाले आहे. या चित्रपटात चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी हा मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री अंजना सुखानी ही पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम करत आहे.पोस्टर,टीझर, ट्रेलर या क्रेझी दुनियेत आता, मोशन पोस्टर या नव्या प्रमोशन फं डयाचे ताजे उदाहरण म्हणजे 'लाल इश्क'चं पहिलं मोशन पोस्टर. हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.