Join us  

धर्मवीरमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेचा क्षितीजची पत्नी आहे ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 7:00 AM

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दाते साकरतोय. क्षितिजचा या सिनेमातील लूक पाहून एकनाथ शिंदे ही भारावून गेले होते.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmaveer)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. यात चित्रपटातील अभिनेता प्रसाद ओकच्या (prasad oak) लूकपासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत आहे. त्यामुळे या चित्रपटाला मिळत असलेलं प्रेम पाहून प्रत्येक जण भारावून गेला आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला यावेळी सलमान खान, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि रितेश देशमुख उपस्थित होते. 

या सिनेमातएकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दाते साकरतोय. क्षितिजचा या सिनेमातील लूक पाहून एकनाथ शिंदे ही भारावून गेले होते. तुम्हाला माहिती आहे का क्षितिजची पत्नी ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. क्षितिज आणि नेहाने गेल्यावर्षी लॉकडॉऊनमध्ये मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थित लग्न उरकलं. क्षितिज प्रमाणे त्याची पत्नी ऋचा आपटे ही देखील अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबतचे फोटो नेहमी शेअर करत असतात.ऋचा आणि क्षितिज 'बन मस्का' या मालिकेतून एकत्रित काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.

क्षितीजने 'मुळशी पॅटर्न' सिनेमात काम केले आहे. ऋचाने 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत झळकली होती, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतही ती राणा दाच्या ट्रेनरच्या भूमिकेत झळकली होती. सध्या 'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेत ऋचा झळकत आहे. याशिवाय अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.

टॅग्स :एकनाथ शिंदेप्रसाद ओक सिनेमा