‘YZ’ या चित्रपटातील सर्वच गोष्टी या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणा-या असतात. टिझर, ट्रेलर, ओ काका या सर्व गाण्यांविषयी आपल्या सर्वांना माहित आहे. आता उत्सुकता वाढवण्याच्या यादीमध्ये संस्कृत गाण्याची भर पडली आहे.
आपण सध्याच्या चित्रपटात युथच्या स्टाईलचं संस्कृत गाणं कधी पाहिल्याचं आठवतंय? पण ‘YZ’ या चित्रपटाने कूल असं संस्कृत गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित केलं आहे. प्रियकरा असं हे ‘YZ’ मधील संस्कृत गाणं आहे आणि या गाण्याला केतकी माटेगांवकर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला आहे. या सुंदर संस्कृत गाण्याला संगीत ह्रषिकेश दातार, जसराज जोशी आणि सौरभ भालेराव यांनी दिले आहे.
एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत, क्षितीज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘YZ’ चित्रपट १२ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.