Join us  

केदार शिंदेंनी शेअर केला वंदना गुप्तेंचा कधीही न पाहिलेला 'भारी' फोटो, 'बुलेटवर बसून....'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 1:11 PM

अभिनेत्री वंदना गुप्ते आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

सध्या मराठी सिनेमांना अच्छे दिन आले आहेत. 'वाळवी', 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटांनंतर 'बाईपण भारी देवा' बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सहा बायकांनी मिळून सिनेमात जी काही धमाल केलीए ती आता प्रेक्षक पडद्यावर अनुभवत आहेत. हसवणारा, मध्येच रडवणारा, नात्यांची गुंतागुंत सोडवणारा असा हा सिनेमा आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांची मुख्य भूमिका आहे. तर सिनेमात शशी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्तेंचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त केदार शिंदेंनी एका भारी फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र आजही त्यांचं डॅशिंग व्यक्तिमत्व कायम आहे. सिनेमातही शशी या व्यक्तिरेखेतून ते दिसून आलं. त्यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली आहे. तर वंदना गुप्ते यांच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी (Kedar Shinde)  एक भारी फोटो शेअर केलाय. यामध्ये वंदना गुप्ते बुलेटवर बसलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांनी कुर्ता आणि जीन्स परिधान केली असून बुलेटवर बसून त्या पोज देत आहेत.  'वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझी डॉन' असं कॅप्शनही त्यांनी लिहिलं आहे.सध्या त्यांचा फोटो चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला आहे. सोशल मीडियालर फोटो तुफान व्हायरलही होतोय.

'बाईपण भारी देवा'ने बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. 16 दिवसांनंतरही सिनेमा हाऊसफुल सुरु आहे. चित्रपटाने २० कोटींच्या पार कमाई केली आहे. एकाच दिवसात ६ कोटींची कमाई करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. अनेक बायका अगदी ग्रुप ग्रुपने चित्रपट बघायला जात आहेत. मराठी सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय.

टॅग्स :वंदना गुप्तेकेदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट