Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध

By कोमल खांबे | Updated: June 28, 2025 13:41 IST

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी हिंदी भाषा सक्तीवरुन खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.

राज्य सरकारने त्रिभाषा सुत्रीकरणाच्या अनुषंगाने घेतलेल्या पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे. राजकीय नेते आणि पक्षांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करत पहिलीपासून हिंदी सक्ती नको असं म्हटलं आहे. अनेक सेलिब्रिटीही सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आहेत. आता मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी हिंदी भाषा सक्तीवरुन खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमधून त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. "ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ....' यात पहिली ते चौथीच्या बाळांना कन्फ्युज करू नका... त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या" असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. "हिंदी सक्ती नकोच, जय महाराष्ट्र" असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, केदार शिंदेंसोबतच अनेक कलाकारांनी पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध केला आहे. मकरंद अनासपुरे, हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, किरण माने या कलाकारांनी त्यांच्या भूमिका मांडत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक कलाकार हळूहळू पुढे येत त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी अभिनेता