Join us

शांताबाई गाण्यानंतर आता कांताबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:22 IST

संजय लोंढे यांच्या शांताबाई या गाण्याने संपूर्ण राज्यातच सैराटमय वातावरण निर्माण केले होते. या गाण्यावर लहानांपासून ते मोठयांपर्यत प्रत्येकजण ...

संजय लोंढे यांच्या शांताबाई या गाण्याने संपूर्ण राज्यातच सैराटमय वातावरण निर्माण केले होते. या गाण्यावर लहानांपासून ते मोठयांपर्यत प्रत्येकजण या गाण्यावर पाय थिरकताना दिसले. आज ही लग्नसोहळे, पार्ट्या अशा विविध कार्यक्रमांमध्ये शांताबाईची जादू प्रेक्षकांना दिसली. आता लवकरच, शांताबाई पाठोपाठ प्रेक्षकांना कांताबाईची सेल्फी हे गाणे ऐकण्यास मिळणार आहे. या गाण्यावर अभिनेत्री स्मिता गोंदकर कांताबाई करताना पाहायला मिळणार आहे. हे गाणे समर्थक शिंदे यांनी गायले आहे. चला तर पाहूयात, प्रेक्षकांमध्ये कांताबाई काय जादू करते.