Join us  

जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 7:00 AM

फार कमी लोकांना माहित आहे की,जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची लेकदेखील अभिनेत्री आहे.

हिंदी आणि मराठी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही अभिनेता जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी काम केले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी एकाहून एक दमदार भूमिका केल्या आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटात छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की,जयवंत वाडकर यांची लेकदेखील अभिनेत्री आहे. तिचे नाव स्वामिनी  (Swamini wadkar)आहे.

जयवंत वाडकर यांनी १९८८ साली 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून कारकीर्दीची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी १९८८ साली एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून जास्त चित्रपटात काम केले आहे. तसेच छोट्या पडद्यावरही त्यांनी भरपूर काम केले आहे. जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव तन्मय तर मुलीचे नाव स्वामिनी आहे. स्वामिनी सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या 'एफ यू' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच तिने सचिन पिळगावकर यांच्या 'ये है आशिकी' या चित्रपटात तिने काम केले होते.

टॅग्स :जयवंत वाडकर