Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिंद आणि मराठीतील आर्चीचं सैराट झालं जी.. काय आहे या भेटीमागचं गुपित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 15:13 IST

रिंकूने आणि जान्हवीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

रिंकू राजगुरु सैराट या सिनेमानंतर आर्ची या नावाने घराघरात पोहोचली. या सिनेमातून ती मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. सैराटचे यश पाहता यासिनेमाचा रिमेक बॉलिवूडमध्ये झाला आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकतीच रिंकू आणि जान्हवीची भेट झाली. रिंकूने आणि जान्हवीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिंकूने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला तर जान्हवीने जीन्स आणि टॉप घातला आहे. जान्हवी आणि रिंकूचा हा फोटो  फॅन्सना आवडला आहे.  या भेटी मागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर रिंकू मेकअप सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून गणेश पंडित दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मेकअपचा टीझर रिलीज झाला होता.

या टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे. हा टीजर पाहून ग्रामीण भागातील मुलगी शहरात आल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडते हे पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे.

जान्हवीबाबत बोलायचे झाले तर ती ‘रूहअफ्जा’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दिशेन विजान निर्मित सिनेमा हॉरर-कॉमेडी असणार आहे. 'रूही' आणि 'अफ्जा' असे दोन रोल ती साकारताना दिसेल. सिनेमा वेगळ्या जॉनरचा असल्यामुळे जान्हवीचा अंदाज निराळाच असणार हे मात्र नक्की.असून २० मार्च २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूजान्हवी कपूर