Join us

IPLच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला सिद्धार्थ जाधव, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: April 2, 2025 10:57 IST

सिद्धार्थ जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कॉमेंट्री करताना दिसत आहे.

सध्या सर्वत्र आयपीएलचा माहौल आहे. आयपीएलच्या या १८व्या हंगामात रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना खेळवला गेला. सलग दोन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवता आला. पण, मुंबई इंडियन्स आणि केकेआरमधील हा सामना खऱ्या अर्थाने खास ठरला. कारण, या सामन्यावेळी मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव कॉमेन्ट्री बॉक्समध्ये दिसला. 

सिद्धार्थ जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कॉमेंट्री करताना दिसत आहे. सिद्धार्थने आयपीएलच्या मराठी समालोचनासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी सिद्धू मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसला. "#आपलासिध्दू in Tata IPL २०२५ ...मराठी समालोचन... @jiohotstar वर...समालोचन कक्षात केलेली मजा , मस्ती ,धिंगाणा...आणि @mumbaiindians चा पहिला विजय...", असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे. 

सिद्धू हा मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर काही शोज सूत्रसंचालनही सिद्धार्थ करतो. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवआयपीएल २०२४मुंबई इंडियन्स