Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुन्हा लग्न करायला भीती वाटत होती पण...', स्वप्नील जोशीच्या लग्नाची दुसरी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:18 IST

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने पत्नी लीनासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. स्वप्निल जोशी एक अभिनेता म्हणून नावारुपाला येत असताना स्वप्निल जोशीच्या जीवनात अनेक चढ उतार आले. पण एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी लीना जोशी. त्याने पत्नी लीनासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. 

स्वप्निल जोशी म्हणाला की, 'माझ्या लग्नाआधी असे काही प्रसंग घडले होते त्यामुळे माझे आई बाबा फार चिंतेत होते. त्यामुळे पुन्हा लग्न करावं की नाही याविषयी माझ्या मनामध्ये खूप भीती होती. नवीन मुलगी माझ्या घराला,आई वडिलांना सांभाळून घेईल की नाही अशी चिंता सारखी सतावत होती. मात्र लीना लग्न होऊन घरात आली आणि ती माझ्या आधी माझ्या आई वडिलांची झाली'.

स्वप्निल पुढे म्हणाला, 'कोणताही मुलगी आपलं हक्काचं घर सोडून, आपला परिवार सोडून एका नव्या कुटुंबात येते आणि समर्पणाच्या भावनेने नवीन कुटुंबाला ती आपलासे करते. ते कुटुंब तिची जबाबदारी बनते ते परिवार तिचे सर्वस्व होते. तो परिवार तिचा एक भाग बनतो. ही कल्पनाच फार कमाल आहे. हे करणारी प्रत्येक स्त्री सावित्री आहे. माझ्या घरात लीनाच माझी सावित्री आहे. ते घर माझं आहे पण  तिनं माझ्या परिवाराला नव्या उमेदीने उभे केले.  त्याबद्दल मी तिचा आयुष्यभर ऋणी असेन.

स्वप्निल जोशीची पत्नी लीना ही डेन्टिस्ट असून २०११ साली लीना आणि स्वप्निल यांनी लग्न केले. त्या दोघांना मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशी