Join us

आय लव्ह यू डॅडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:23 IST

         रितेश देशमुख सध्या त्याचे चित्रपट, टिव्ही शो आणि नवीन लुकमुळे चांगलाच चर्चेत आहे. कामामध्ये ...

 
        रितेश देशमुख सध्या त्याचे चित्रपट, टिव्ही शो आणि नवीन लुकमुळे चांगलाच चर्चेत आहे. कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी रितेश त्याच्या कुटुंबाला नेहमीच वेळ देतो. असे आम्ही सांगत नाही तर, जेनेलियानेच काही दिवसांपूर्वी असे सांगून तिच्या नवऱ्याचे तोंडभरून कौतुक केले होते. रितेशला रिआन आणि राहिल अशी दोन मुले आहेत. सोशल मीडियावरही रितेश त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो नेहमीच शेअर करत असतो. असाच एक सुंदर फोटो नुकताच रितेशने ट्विटरवर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये रितेश त्याचा लहान मुलगा राहिल सोबत मजा-मस्ती करताना दिसतो आहे. रितेशने त्याच्या आईच्या वाढदिवशी त्याच्या मुलासोबतचा हा पहिलाच फोटो शेअर केला आहे. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. आणि याखास दिवशी मला तुमच्या सोबत काहीतरी खास शेअर करायचे आहे. असे ट्वीट करून रितेशने हा झक्कास फोटो अपलोड केला आहे.