Join us

हृता दुर्गुळेचा हेवी वर्कआऊट; व्हिडीओ पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 18:37 IST

Hruta durgule: या व्हिडीओवरुन हृता तिच्या फिटनेसच्या बाबतीत किती सजग आहे याचा अंदाज लावता येतो.

अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. 'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. यामध्येच आता सोशल मीडियावर तिचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हृताने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जीममध्ये असून हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिची वर्कआऊट करायची पद्धत पाहून ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत किती सजग आहे याचा अंदाज लावता येतो.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये फिटनेस ट्रेनरच्या मदतीने हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. हृता तिच्या जीवनातील अनेक लहान मोठ्या घटना, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. हृताने प्रतिक शहा याच्यासोबत लग्न केलं. या जोडीला लग्नसोहळा मराठी कलाविश्वात विशेष गाजला होता.  

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीसिनेमा