Join us

हिंदी मालिकाविश्वातील अभिनेत्री रिधिमा पंडित झळकणार 'प्रेमाची गोष्ट २'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:07 IST

Premachi Goshta 2 Movie: 'प्रेमाची गोष्ट २' हा दिवाळीत प्रदर्शित होणारा रोमॅण्टिक चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रिधिमा पंडित पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत 'प्रेमाची गोष्ट २' (Premachi Goshta 2 Movie) हा दिवाळीत प्रदर्शित होणारा रोमॅण्टिक चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटात रिधिमा पंडित (Ridhima Pandit) पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. 'बहु हमारी रजनीकांत', 'खतरों के खिलाड़ी' हिंदी शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रिधिमा तिच्या सोशल मीडियावरील सक्रीय उपस्थिती आणि रिलेटेबल कंटेंटमुळे जेन झी प्रेक्षकांमध्येही सुपरहिट ठरली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स आणि रिल्स नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यामुळे तिचं मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठीच नाही, तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राईज ठरणार आहे.

नुकतंच प्रदर्शित झालेलं 'ये ना पुन्हा' हे रिधिमा आणि ललित प्रभाकरवर चित्रित झालेलं रोमॅण्टिक गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून, चित्रपटाबद्दलचं कुतूहल अधिकच वाढत चाललं आहे. पहिल्या मराठी चित्रपटाविषयी रिधिमा म्हणाली, ''हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच मी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसतेय. त्यामुळे उत्साह आणि थोडीशी धडधड अशा मिश्र भावना आहेत. सतीश राजवाडे सरांसोबत काम करणं माझ्यासाठी एक खास अनुभव ठरला. ललितसोबत काम करताना खूप मजा आली. तो अत्यंत उत्तम सहकलाकार आहे. एकूणच हा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आणि अविस्मरणीय ठरला असून प्रेक्षक माझ्या या नव्या प्रवासाला नक्कीच प्रेम देतील, अशी मला खात्री आहे.''

या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ridhima Pandit debuts in Marathi cinema with 'Premachi Goshta 2'.

Web Summary : Ridhima Pandit, famed for Hindi TV shows, debuts in Marathi cinema with 'Premachi Goshta 2', releasing this Diwali. Her song with Lalit Prabhakar is trending, heightening anticipation for her role directed by Satish Rajwade. Ridhima expresses excitement about her first Marathi film.
टॅग्स :ललित प्रभाकर