Join us

हेमंत ढोमेच्या गावात धक्कादायक घटना; बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, अभिनेता म्हणाला- "नुसते पिंजरे लावून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:27 IST

शिरुरमधल्या पिंपरखेड गावात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी (१२ ऑक्टोबर) भर दिवसा साडे पाच वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. ज्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मराठी अभिनेता हेमंत ढोमेनेही संताप व्यक्त करत यावर ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारला विनंती केली आहे. 

शिरुरमधल्या पिंपरखेड गावात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी (१२ ऑक्टोबर) भर दिवसा साडे पाच वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. ज्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. शिवन्या शैलेश बोंबे या चिमुकलीने बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला आहे. सकाळी पावणे दहा वाजता सुमारासा ही घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं असून गावकऱ्यांकडून संतापही व्यक्त केला जात आहे. मराठी अभिनेता हेमंत ढोमेनेही संताप व्यक्त करत यावर ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारला विनंती केली आहे. 

हेमंत ढोमेने X अकाऊंटवरुन ट्वीट करत ही घटना त्याच्या गावातच घडली असल्याचं म्हटलं आहे. "सदर घटना ही माझ्या गावातील असून अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे खासदार अमोल कोल्हे यांनी वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला आहे परंतु सरकार कडून काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत. मानव आणि जंगली प्राण्यांच्या या संघर्षात दोघांनाही जगता यावं या करता दूरगामी उपाययोजनेची गरज आहे. नुसते पिंजरे लावून काही होणार नाही", असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

पुढे त्याने "नाहक बळी जात राहणार आणि याचे रूपांतर लोक कायदा हातात घेणार असं होणार. सरकारने लवकरात लवकर यात लक्ष घालायला हवं! लोक शिक्षण आणि इतर बऱ्याच बाबींची गरज आहे. खूप काही करता येऊ शकतं", असंही म्हटलं आहे. 

पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरा मागील शेतातजमीन नांगराणीचे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरूण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून ऊसात फरपटत नेले. आजोबा अरूण देवराम यांनी हे भयावह दृश्य पाहिले असता त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याशी दोन हात करून बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले.तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attack kills girl in Hemant Dhome's village; outrage!

Web Summary : A tragic leopard attack in Pimparkhed killed a five-year-old girl. Actor Hemant Dhome expressed outrage, criticizing ineffective measures. He urged the government for long-term solutions to prevent human-animal conflict after the unfortunate incident in his village.
टॅग्स :Hemant Dhome Today Newsशिरुरबिबट्या