Join us

हेमंत होतोय दिग्दर्शक... ९ मे ला चित्रपटाचा मुहुर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 16:47 IST

           पोश्टरगर्ल या सिनेमातून एक भावनिक विषय प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहचविणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता हेमंत ढोमे ...

           पोश्टरगर्ल या सिनेमातून एक भावनिक विषय प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहचविणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता हेमंत ढोमे आता दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. भारतराव अन बज्या सोबत हेमंत लवकरच येतोय ही बातमी आम्हीच तुम्हाला सांगितली होती. आता याच बातमीचा खुलासा झाला असुन खुद्द हेमंतनेच सीएनएक्सला याबबतीत माहिती दिली आहे. हेमंत म्हणतोय, मी दिग्दर्शन करणार आहे. माझी कथा संपुर्ण लिहुन झाली असुन आम्ही ९ मे पासुन या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहोत.                                                              दिग्दर्शनात पदार्पण का करावेसे वाटतेय असे विचारल्यावर हेमंत सांगतोय, मी लेखक आहे. अन याआधी मी बºयाच चित्रपटांसाठी लेखन केलेय. जेव्हा एखादा लेखक ती कथा लिहीत असतो तेव्ही त्याला त्या कथेला पडद्यावर योग्य न्याय देणे सोपे जाते. कारण त्याला तो सिनेमा डोळ््यासमोर दिसत असतो. असेच माझ्या बाबतीत झाले आहे मला माझी ही स्टोरी व्हीज्युअलाईज होतीये. अन म्हणुनच मी आता दिग्दर्शनात येतोय. जितेंद्र जोशी अन अनिकेत विश्वासराव यांच्या भुमिका यामध्ये असणार आहेत. चित्रपटाचे संगीत अमितराज यांचे असुन गाणी क्षितीज पटवर्धन यांनी लिहीली आहेत. ९ मे ला या चित्रपटाचा मुहुर्त होणार असुन लवकरच टिझर येईल.