Join us

हेमंत आणि क्षितीच्या नातेचे 'हे' आहे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 16:06 IST

मराठी इंडस्ट्रीत सध्या सनई चौघडे वाजवू लागले आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे , चिराग पाटील यांच्यापाठोपाठ अनेक कलाकार ...

मराठी इंडस्ट्रीत सध्या सनई चौघडे वाजवू लागले आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे , चिराग पाटील यांच्यापाठोपाठ अनेक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. मात्र या सर्व नवविवाहीत जोडप्यापाठोपाठ आणखी एक जोडी सोशलमीडियावर लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे म्हणजे अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग. या जोडप्याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशलमीडियावरदेखील त्यांना या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देताना चाहते पाहायला मिळत आहे. तसेच क्षितीनेदेखील दोघांचे काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केली आहेत. तसेच ती सोशलमीडियावर आपल्या पोस्टमधून सांगते की, फेव्हीकॉल का मजबूत जोड है.. तुटेगा नही. या दोघांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. त्यांच्या या फोटोलादेखील सोशलमीडियावर भरपूर लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच हेमंत आणि क्षितीची जोडी चित्रपटसृष्ट्रीत हीट आहे. हेमंतने क्षणभर विश्रांती, जय जय महाराष्ट्र माझा, मंगलअष्टक वनमोअर, आंधळी कोशिंबीर, आॅनलाईन बिनलाइन असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच त्याचा बघतोस काय मुजरा कर हा चित्रपटदेखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हेमंत हा अभिनेता व दिग्दर्शक म्हणून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच क्षितीनेदेखील अनेक चित्रपट व मालिका केल्या आहेत. सध्या ती ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच ती गंध फुलांचा गेला सांगून, तू तिथे मी, वादळवाट अशा अनेक मराठी मालिकदेखील क्षितीने केल्या आहेत.