Join us  

घरबसल्या हेमांगी कवी निघाली cannesवारीला? व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 2:07 PM

Hemangi kavi: सध्या सर्वत्र कान फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी या सोहळ्यात हजेरी लावली आहे. मात्र, हेमांगी कवीने घरबसल्या या सोहळ्यात जाण्याचा आनंद लुटला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी ( Hemangi Kavi). उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी हेमांगी ओळखली जाते. समाजात कोणतीही घटना घडली तर त्यावर हेमांगी न घाबरता स्पष्टपणे तिचं मत नोंदवते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, हेमांगी या ट्रोलर्सलाही खडे बोल सुनावत त्यांची बोलती बंद करते. बेधडकपणे बोलणारी हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे काही फनी व्हिडीओदेखील शेअर करत असते. असाच एक व्हिडीओ तिने सध्या पोस्ट केला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियार प्रचंड सक्रीय असते. हेमांगी विविध विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होत असते. समाजातील विविध मुद्दयावर हेमांगी स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नेहमीच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. याशिवाय ती काही तिचे भन्नाट व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे ती चर्चेत असते. नुकतात हेमांगीनं तिचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र कान फिल्म फेस्टिव्हलची (cannes 2022) जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी या सोहळ्यात हजेरी लावली आहे. मात्र, हेमांगी कवीने घरबसल्या या सोहळ्यात जाण्याचा आनंद लुटला आहे. हेमांगीने सोशल मीडियावर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेमांगीने तिच्या हातात आरसा धरला असून तिने डोळ्यात भरपूर काजळ लावलं आहे. हे काजळ तिने अत्यंत विचित्र पद्धतीने लावलं असून त्यावर फनी एक्स्प्रेशन्स दिले आहेत. 'जेव्हा चांगला मेकअप आर्टिस्ट परवडत नाही..', असं मजेदार कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, 'कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाण्यासाठी मी तयारी करीत आहे,' असंही ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. हेमांगीच्या या विचित्र गेटअपमागे कान फेस्टिव्हलशी संबंध जोडण्यामागे देखील खास कारण आहे. या व्हिडिओमध्ये हेमांगीने एका हॉलिवूड अभिनेत्रीचाही व्हिडीओ जोडला आहे. ज्यामध्ये तिने या फेस्टिव्हलला असा लूक केला होता. 

टॅग्स :हेमांगी कवीसेलिब्रिटीसिनेमा