मकरंद देशपांडेपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या बायकोचा फोटो तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 14:58 IST
आपल्या अभिनयाने मकरंद देशपांडे यांनी मराठी सिनेमासह रंगभूमी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपली छाप पाडली आहे. मकरंद देशपांडे यांच्या व्यवसायिक ...
मकरंद देशपांडेपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या बायकोचा फोटो तुम्ही पाहिला का?
आपल्या अभिनयाने मकरंद देशपांडे यांनी मराठी सिनेमासह रंगभूमी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपली छाप पाडली आहे. मकरंद देशपांडे यांच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच त्यांचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत असते. शशी कपूर यांची कन्या संजना कपूर यांच्यासह मकरंद यांच्या अफेअर आणि रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. पण काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाले. मकरंद देशपांडे यांचे वय ५२ असून ६ मार्च १९६६ साली डहाणू येथे त्यांचा जन्म झाला आहे. ते गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या आणखी एका अफेअरमुळे चर्चेत आले आहेत. मकरंद यांच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा वयाने २५ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणीचे आगमन झाले आहे. तिचे नाव निवेदिता पोहनकर असून ती लेखिका आहे. निवेदिता पृथ्वी थिएटरशी जोडली गेलेली आहे. रंगभूमीवर वावरतानाच या दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या ७-८ वर्षांपासून दोघे एकत्र आहेत. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे निवेदिताने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका सेल्फी वरून सगळ्यांना कळले होते. निवेदिताने दोघांचा एकत्र असलेला सेल्फी शेअर केला होता. या फोटोसोबत तिने 'घरात चुकीला माफी नाही' असं कॅप्शन दिले होते. या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्यात होत्या. या दोघांनी आता नुकतेच लग्न देखील केले आहे. त्यांच्यात असलेल्या वयाच्या अंतरामुळे त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती. निवेदिता ही मराठी अभिनेत्री अदिती पोहनकरची धाकटी बहीण आहे. तिची आई शोभा पोहनकर नॅशनल लेव्हल हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन आहेत. याशिवाय तिचे काका अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत.मकरंद देशपांडे यांनी केवळ मराठी-हिंदीच नव्ह तर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड या चित्रपटांतही काम केले आहे. कयामत से कयामत तक या चित्रपटातून मकरंद यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.