Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:28 IST

Neha Pendse : नेहा पेंडसे नुकतीच पती शार्दुल आणि दोन मुलींसह बालीला व्हॅकेशनसाठी गेली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) सतत चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मराठीबरोबरच नेहाने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. मे आय कम इन मॅडम? या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. २०२० मध्ये नेहाने बिजनेसमॅन शार्दुल बायससह लग्नगाठ बांधली. शार्दुलचं हे दुसरं लग्न असून त्याला आधीच्या लग्नापासून दोन मुली आहेत. नुकतेच नेहा आणि शार्दुल त्यांच्या मुलींसह बालीला व्हॅकेशनसाठी गेले होते. तिथले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहा पेंडसेने बाली व्हॅकेशन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, बाली विथ फॅमिली. यातील पहिल्या फोटोत ते चौघे आहेत. दुसरा व्हिडीओ असून नेहा लेकींसोबत धबधब्याच्या पाण्याखाली एन्जॉय करताना दिसते आहे. तिसऱ्या फोटोत ते चौघे स्विमिंग पूलच्या पाण्यात मजा करताना दिसत आहेत. याशिवाय गो कार्टिंग, रिव्हर राफ्टिंग करताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये नेहाचे तिच्या सावत्र मुलींसोबत छान बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते आहे. 

नेहा पेंडसेने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती फॅमिलीसोबत धमालमस्ती करताना दिसते आहे. या व्हिडीओलाही चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी तुला दोन मुली आहेत का, असा प्रश्न विचारत आहेत. तर काहींनी त्यांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं.

नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र तिने ही मालिका सोडली आणि तिची जागा विदिशा श्रीवास्तवने घेतली आहे. नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली आहे.

 

टॅग्स :नेहा पेंडसे