Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा जोशीचा साडीमधील हा लूक पाहिला का?, सौंदर्य गेलं आणखी खुलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:30 IST

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत नेहा तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो नेहा सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.  सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. काही महिन्यांपूर्वी नेहाच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती. या प्रत्येक फोटोमध्ये नेहाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. 

आता पुन्हा एकदा नेहाने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साडीमध्ये तिचे  फोटो पाहून चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. यामध्ये तिचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे. साडीमध्ये तिचे  सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. 

नेहा जोशीने पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.  

टॅग्स :नेहा जोशी