Join us

नितिन देसाई यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:49 IST

मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांचा आज वाढदिवस.  नितिन देसाईंनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले ...

मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांचा आज वाढदिवस.  नितिन देसाईंनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे.

हॅलो जय हिंद!, अंजिठा या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे.  बालगंधर्व या मराठी चित्रपटाची निर्मिती नितिन देसाईंनी केली. परिंदा, 1942: अ लव्ह स्टोरी, आ गले लग जा, सलाम बॉंबे, हम दिल दे छुके सनम, देवदास, मिशन काश्मीर यांसारख्या अनेक चित्रपटांचे आर्ट डिरेक्शन नितिन सरांनी केले आहे. तसेच प्रोडक्शन डिझायनर म्हणून लगान, हम दिल दे छुके सनम, मिशन काश्मीर, देवदास, खाकी, स्वदेस आदी चित्रपटांतील काम पाहिले आहे. त्यांच्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील उत्तम कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. हरिश्चंद्राची फॅक्टरी या मराठी चित्रपटाचे बेस्ट आर्ट डिरेक्शन म्हणून 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' नितिन सरांनी मिळवला आहे.   

कलादिग्दर्शक, दिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांना वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा!