Join us

सई ताम्हणकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 12:53 IST

         शिरीन, नंदिनी, आलिया या भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस.  सई ताम्हणकरने ...

         शिरीन, नंदिनी, आलिया या भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस.  सई ताम्हणकरने मराठी चित्रपटासह मराठी मालिकेत आणि हिंदी चित्रपटात पण काम केले आहे.

सनई चौघडे, नो एंट्री पुढे धोका आहे, पुणे 52, टाइम प्लीज, दुनियादारी, पोरबाझार, प्यारवाली लव्ह स्टोरी, क्लासमेट्स, लालबाग परळ, तू हि रे आदी मराठी चित्रपटात सईने काम केले आहे. गजिनी या हिंदी चित्रपटातून सईने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि नंतर ब्लॅक अँड व्हाईट, सिटी ऑफ गोल्ड, हंटर हे हिंदी चित्रपट सईने केले. अनुमती या मालिकेत पण तिने काम केले आहे.

सई ताम्हणकर पर्णरेखा या भूमिकेतून लवकरच ‘YZ’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच वझनदार, राक्षस हे सईचे आगामी प्रोजेक्ट्स आहेत.

सुंदरा अभिनेत्री सई ताम्हणकरला वाढदिवसाच्या आणि तिच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!