‘शमिका’, ‘मंजिरी’ या पात्राच्या भूमिकेतून सर्वांच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचा आज वाढदिवस. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ मालिकेमधील ‘शमिका’ आणि ‘तू तिथे मी’ मालिकेतील ‘मंजिरी’ यांच्या भूमिकेतून मृणालने प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स कार्यक्रमात पण तिने सहभाग घेतला होता. एबीपी माझा वरील ‘रिमोट माझा’ या शो चे आणि झी मराठी वरील ‘आम्ही सारे खवय्ये’ या कुकिंग शोचे निवेदन मृणालने केले आहे.
मालिकेसह मृणालने ‘रक्तपुष्प’ या नाटकात तर ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम करत आहे.
अभिनेत्री मृणाल दुसानिसला वाढदिवसाच्या आणि तिच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!!