प्रार्थना बेहरे न्यूझिलंडमध्ये करतेय वाढदिवसाचे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 16:40 IST
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या पती अभिषेक जावकरसोबत फुल ऑन हनिमून एन्जॉय करताना दिसतेय. जवळपास महिनाभर ती वेगवेगळ्या देशात रम्य ...
प्रार्थना बेहरे न्यूझिलंडमध्ये करतेय वाढदिवसाचे सेलिब्रेशन
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या पती अभिषेक जावकरसोबत फुल ऑन हनिमून एन्जॉय करताना दिसतेय. जवळपास महिनाभर ती वेगवेगळ्या देशात रम्य स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेत पती अभिषेकसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करणार आहे. सध्या ती न्यूझिलंडमध्ये असून तिथे खूप सारी धमाल-मस्ती करत आहे. तिचा नुकताच वाढदिवस झाला असून तिचे पती अभिषेकसोबत तिने वाढदिवस साजरा केला. प्रार्थना गेल्या कित्येक दिवसांपासून भारताच्या बाहेर असल्याने तिच्या फॅन्ससोबत तिला संवाद साधायची संधी मिळत नाहीये. त्यामुळे तिने वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. ती सध्या न्यूझिलंडमध्ये असल्याचे देखील तिनेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. ती गेल्या चाळीस दिवसांहून अधिक काळ भारताच्या बाहेर आहे. त्यामुळे ती तिच्या फॅन्सना आणि तिच्या इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींना खूपच मिस करत आहे. ती लवकरच भारतात परतणार असल्याचे तिने तिच्या फॅन्सना सांगितले आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्री अभिनय क्षेत्राला रामराम ठोकतात. पण लग्नानंतरही चित्रपट करतच राहाणार असल्याचे प्रार्थनाने तिच्या फॅन्सना सांगितले आहे. तसेच तिचे पुढील प्रोजेक्ट काय असणार आहेत याबद्दल देखील तिच्या फॅन्ससोबत गप्पा मारल्या आहेत. वाढदिवसाच्या दिवशी तू काय केलेस असे प्रार्थनाला तिच्या एका चाहत्याने विचारले असता मी न्यूझिलंडला बंजी जम्पिंग केले. हे माझ्या वाढदिवसासाठी माझ्या पतीने मला गिफ्ट दिले असल्याचे देखील तिने सांगितले.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच रेशीमगाठीत अडकली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचे शुभमंगल गोव्यात पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला प्रार्थनाचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धमाल केली. त्यांनी सगळ्यांनी प्रार्थनाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. प्रार्थनाचे लग्न गोव्यात झाले होते.Also Read : प्रार्थना बेहरेचा नवा टॅटू तुम्ही पाहिला का?