Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाफ तिकिट जुलैमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 18:00 IST

दिग्दर्शक समित कक्कड तिकीटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लहान मुलांची अनोखी कहाणी ते मांडण्यास सज्ज झाले आहेत. यापूर्वी त्यांनी आयना ...

दिग्दर्शक समित कक्कड तिकीटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लहान मुलांची अनोखी कहाणी ते मांडण्यास सज्ज झाले आहेत. यापूर्वी त्यांनी आयना का बायना या चित्रपटातून बालसुधारगृहातील लहान मुलाचं भावविश्व रेखाटलं होत. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे भावविश्व रेखाटणाºया हाफ तिकीट हा असाच एक वेगळा दृष्टीकोन देणारा चित्रपट असणार आहे. निमार्ते नानूभाई जयसिंघानी आणि दिग्दर्शक समित कक्कड यांनी नुकतेच या चित्रपटाचे आकर्षक असं डिजीटल पोस्टर उलगडलं. हाफ तिकीट हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.