Join us

कान्स मध्ये हाफ तिकीटची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2016 13:23 IST

              मराठी चित्रपट ग्लोबल होत आहे असे नूसते म्हटले जात नाही तर मराठी ...

              मराठी चित्रपट ग्लोबल होत आहे असे नूसते म्हटले जात नाही तर मराठी सिनेमाने सातासमुद्रापार जाऊन आपली मोहोर उमटविली आहे. आपला मराठी चित्रपट इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहचला असुन परदेशी प्रेक्षक देखील मराठी सिनेमांची प्रशंसा करताना दिसत आहेत. ऐवढेच काय तर आता बºयाच सिनेमांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये आपली कमाल दाखविली आहे.  समीत कक्कड दिग्दर्शीत हाफ तिकीट या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नूकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले होते. दोन लहान मुलांची कथा प्रभावीपणे मांडण्यात आलेल्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असतानाच हा चित्रपट आता कान्स भरारी घेत आहे. फ्रान्समध्ये होणाºया कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये सहभागी होण््यासाठी हाफ तिकीटची टिम सज्ज झाली आहे. दिग्दर्शक समीत कक्कड आन निर्माते सुरेश जयसिंघानी ११ मे ते २२ मे दरम्यान होणाºया कान्स फेस्टीवलसाठी जाणार आहेत. माझी कान्ससाठी ही दुसरी वेळ आहे. आमच्यासाठी हा अतिशय सुवर्णक्षण आहे. मराठी सिनेमा आम्ही इंटरनॅशनल स्तरापर्यंत घेऊन आलो आहोत याचा आनंदच आहे. मराठी चित्रपटांना आज जागतिक स्तरावर अटेन्शन मिळत असल्याचे समीत कक्कड सांगत आहेत.